माजी आ. मेधा कुलकर्णी यांच्यावर आला हा प्रसंग...

Update: 2023-08-08 07:19 GMT

रात्रीच्या दीड वाजता फूटपाथ वर एक दारुडा दारू पिऊन मोठमोठ्याने फोनवर चोरीच्या गाडी विषयी बोलतो होता. हे सर्व एका माजी महिला आमदाराने ऐकलं. काहीतरी गडबड आहे हे समजल्यानंतर त्या स्वतः त्याच्याजवळ गेल्या. पोलिसांना फोन केला. पण आपलं पोलीस प्रशासन किती सतर्क आहे हे या घटनेतून समोर आलं. पोलीस आता येतील मग येतील म्हणत म्हणत त्यांनी त्या दारुड्याला रोखण्याचा 30 मिनिट प्रयत्न केला पण पोलीस घटनास्थळी काही पोहोचले नाहीत. एक महिला आमदार पोलिसांना फोन करते त्यानंतर तीस मिनिट मध्यरात्री रस्त्यावर एका दारुड्याला पोलीस येईपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करते पण पोलीस काही पोहोचत नाहीत. एका माजी आमदाराने फोन केल्यानंतर पोलिसांची इतकी बेपर्वाई मग तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी विचार न केलेलाच बरा...

भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी एक ट्विट केलं आणि यानंतर पोलीस प्रशासन किती सतर्क आहे याचा पर्दाफाश झाला. चोरीची गाडी घेऊन जाणाऱ्या एका दारुड्याला पोलिसांनी पकडावं यासाठी रात्री दीड वाजता मेधा कुलकर्णी रस्त्यावरती उभा होता त्याला पोलीस येईपर्यंत अडवण्याचा प्रयत्न करत होत्या. पण पोलीस काही पोहोचले नाही मग त्यानंतर काय. झालं? काळ रात्री नक्की त्यांच्यासोबत काय घडलं याविषयी त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. या व्यक्तीचा त्यांनी व्हिडिओ शेअर करत म्हंटल आहे कि, ''ही व्यक्ती रात्रीचे 1.15 वाजता दारू पिऊन मोठ्याने फोनवर चोरीच्या गाडीचा उल्लेख करत बोलत होती. पोलिसांना फोन करून त्यांना अडवून ठेवण्याची कसरत रात्री रस्त्यात एकटीने 30 मिनिटे केली. पोलीस येईपर्यंत नाही करता आली. यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला टॅग करत म्हंटल आहे लक्ष द्या, लवकर मदत पाठवत जा... रोज असे काही ना काही घराजवळच्या फूटपाथवर चालते. कधी घोळक्याने दंगा, शिव्या, कधी वाढदिवस, कधी मारामार्‍या ... सकाळी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात.

हे ट्विट पाहिल्यानंतर पोलीस प्रशासन नक्की काय करतं? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. एक माजी महिला आमदार पोलिसांना फोन करतात व त्यांना पोलीस जर दाद देत नसतील तर सर्वसामान्यांना पोलीस जुमानत असतील का? असे प्रश्न या निमित्ताने लोकांकडून उपस्थित केले जात आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये अत्यंत बिनधास्तपणे व्यक्त करा...

Tags:    

Similar News