चार निराधार मुलीसाठी यशोमती ठाकूर बनल्या आधारवड

पालकत्व गमावलेल्या चार मुलींना घेऊन आजी भेटल्या यशोमती ठाकूर यांना त्यानंतर काय झालं वाचा सविस्तर...

Update: 2021-08-05 10:44 GMT

अमरावती जिल्यातील माळेगाव येथील चार अनाथ मुलींना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी निवासाची व शिक्षणाची मोफत सोय करून दिली. अगदी नकळत्या वयातच या मुलींनी आपल्या मातापित्यांचे छत्र हरवले. त्यानंतर या चारही मुलींचे संगोपन त्यांच्या वयोवृद्ध आजी करत होत्या. या नकळत्या मुलींची संपूर्ण जबाबदारी आजीवर आली होती. या चार मुलींपैकी विधी प्रवीण राठोड ही तीन वर्षाची तर तिची बहीण परिंदी ही सहा वर्षाची आहे. त्यांना मोठ्या दोन बहिणी आहेत नीलम व नयना वानखेडे या देखील अजून अल्पवयीन आहेत.

चारही बहिणी अचानक अनाथ झाल्यामुळे त्यांच्या भविष्याचं काय असा प्रश तिच्या आजीला पडला होता. त्यानंतर मुलीच्या नातलगांनी अमरावती जिल्याच्या पालकमंत्री व महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. मुलींची ही सगळी व्यथा ऐकल्यानंतर त्यांनी या मुलींच्या शिक्षणाची व राहण्याची सोय केली. यातील दोन मुली खूपच लहान असल्यामुळे त्यांना अनाथालयात तर त्यांच्या मोठया दोन्ही बहिणींना मोझरी येथील शाळेत निवासाची व मोफत शिक्षणाची सोय यशोमती ठाकूर यांनी करून दिली. या सर्व प्रकारानंतर त्या मुलींचे संगोपन करणाऱ्या आजीचा उर कृतज्ञतेने भरून आला.

Tags:    

Similar News