"Women Day Special :वो स्त्री हैं जनाब ,वो कुछ भी कर सकती हैं"

तिचा सहवास सगळ्यांना हवा. पण ' ती ' नको...तिचं प्रेम हवं पण ' ती ' नको.. तिची सोबत हवी पण ' ती ' नको. असं का ?? जागतिक महिला दिनानिमित्त तिच्यावर आणि तिच्या आयुष्यावर भाष्य करणारा गौरी बैकर यांचा लेख नक्की वाचा ...

Update: 2023-03-08 06:59 GMT

तिचा सहवास सगळ्यांना हवा. पण ' ती ' नको...तिचं प्रेम हवं पण ' ती ' नको.. तिची सोबत हवी पण ' ती ' नको. असं का ?? जागतिक महिला दिनानिमित्त तिच्यावर आणि तिच्या आयुष्यावर भाष्य करणारा गौरी बैकर यांचा लेख नक्की वाचा ...

तिचा सहवास सगळ्यांना हवा. पण ' ती ' नको...तिचं प्रेम हवं पण ' ती ' नको.. तिची सोबत हवी पण ' ती ' नको. असं का ?? जन्माला घालणारी सुद्धा' ती ' असते. घराचा सांभाळ करणारी सुद्धा ' तिचं '. संसार मांडणारी ही 'ती'. तिच्या येण्याने आयुष्य खूप सुंदर होत आणि तिच्या असण्याने आयुष्य बहरून जातं.

एका बाजुला अनेक खेड्यापाड्यात लहान मुली-महिलांवर अत्याचार होतात. मानसिक अत्याचार तर होतोच पण शारीरिक देखील.. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या पीडितांना आधाराची गरज असते. पण समाजाच्या भीतीने 'ती'च्या वेदना ती कुणालाच सांगत नाही.

अशा अनेक महिला आहेत ज्या आपल्या वेदना सहन करुन आपल्या कुटुंबाचे नाव आणि आपल्या स्वप्नाच्या दिशेने चालत आहेत...

आज म्हणे महिलांचा दिवस आहे... त्यामुळे महिलांविषयी लेख प्रदर्शित होतील... पण जिच्या बद्दल लिहितात तिची खरंच इतकी चिंता असते का ओ????.. तिला इतका सन्मान मिळतो का ??. अशा असंख्य प्रश्नांचं काहूर मनात कायम माजत असतं...आजचा हा दिवस महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची आठवण म्हणून दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २८ फेब्रुवारी १९०९ मध्ये न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याची प्रथा जगभरात सुरू झालीय.

१९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचने नुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा त्यांच्या मागण्या होत्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

आज कित्येक महिलांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून स्वतःच अस्तित्व निर्माण केल्याचं आपण पाहतोय. पण आता परिस्थिती बदलतेय. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीरित्या जबाबदा-या पार पाडत आहेत. कित्येक क्षेत्रात महिला आपलं वर्चस्व गाजवत आहेत. आवडीच्या क्षेत्रात महिला पुढे आहेत. पण अजूनही काही क्षेत्रात त्यांचं स्थान हे खालीच आहे.

स्मृती मंदना तिच्या क्रिकेट खेळात पुढे आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात आपलं स्थान तयार केलं आहे. इंदिरा गांधींनी भारतासारख्या लोकसंख्येनं मोठ्या लोकशाही राष्ट्राचं पंतप्रधान पद यशस्वीरित्या सांभाळलं होतं. अशा अनेक महिला आहेत. ज्या आपल्या विचार, क्षमतेने, आणि स्वबळावर आपली स्वप्न पूर्ण करत आहेत.

अनेक महिलांच्या आयुष्यात एक तरी असा क्षण असतो जो पुन्हा आयुष्यात कधीच येऊ नये असं वाटत. महिला या प्रत्येक क्षेत्रात आहेत खऱ्या.. पण त्यांना पाठबळ हे पतीच असतं..आज आपल्या राष्ट्रपती या देखील एक महिलाचं आहेत. देशासाठीचं महत्त्वाचं असलेलं राष्ट्रपती पद महिला भूषवू शकतात. पण पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर महिला का नाही ? या प्रश्नाचं उत्तर राज्यकर्त्यांना आज ना उद्या विचारला जाणारच आहे...मात्र, आजवर महिलेला मुख्यमंत्री पदी न बसविणा-या राज्यकर्त्यांना इतिहास कधीही विसरणार नाही...

सुचेता कृपलानी यांच्या रूपानं स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली.कृपलानी यांनी उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. १२५८ दिवस त्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. गोव्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकला काकोडकर होत्या. त्यांनी १२ ऑगस्ट १९७३ ते २७ एप्रिल १९७९ पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला. जयललिता यांनी तामिळनाडू मधील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून मान मिळवला. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून ६ वेळा पदभार सांभाळला आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेशचं चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं.

भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी काही काळासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.१२ ऑक्टोबर १९९८ ते ३ डिसेंबर १९९८ या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. राजकारणात महिला राजकारण्यांची फक्त पदं आपल्याला दिसतात. मात्र प्रत्यक्षात त्या पदासोबत मिळणा-या अधिकारांचा वापर हा त्यांचा नवरा किंवा इतर कुणी पुरूष करत असतो.ग्रामपंचायत मध्ये सरपंच किंवा सदस्य जरी महिला असेल तरी पूर्ण कारभार हा त्यांच्या पतीकडून पहिला जातो. -महिला राजकारणात असल्या तरी देखील अपेक्षित प्रमाणात त्यांच्याकडे राजकारणाची सूत्रं नाहीत. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषवत आहेत. या महिलांनी मुख्यमंत्री म्हणून आपलं काम अतिशय उत्तम रित्या सांभाळलं आणि काही जणी अजूनही त्या पदावर आहेत.

पण महाराष्ट्रात एवढा मोठा राजकीय वारसा असून देखील महिला मुख्यमंत्री का झाली नाही. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, रश्मी ठाकरे ही नाव महिला मुख्यमंत्री म्हणून चर्चेत राहिले पण त्यांना ते पद भेटू शकले नाही महिला राजकारणात सक्षम पणे का पुढ येऊ शकल्या नाहीत??

तिच्या बद्दल बोलण्यासारखं अनेक गोष्टी आहेत...

पण...ती खरंच या अपेक्षेत आहे की, तिला जगात free, आणि मनमोकळ जगता येईल...पुरुष जसे कोणते बंधन न बाळगता जीवन जगतात..तसेच महिलांना देखील अधिकार आहे की, स्वप्नांना सोबत घेऊन आपले पंख पसरून उंच आभाळात झेप घ्यावी....

आयुष्य एकदाच मिळत... तर ते थोडा वेगळा आणि अनमोल केलं.. तर जगण्याला अर्थ मिळेल...

त्यामुळे महिलांना समान वागणूक, आणि सन्मान देऊ.....

महिला खूप काही करू शकतात हे तर समजल असेल..

त्यामुळे स्त्री ही सामान नसून ' सन्मान ' आहे...

त्या स्त्री शक्तीचा जागर करणं..काळाची गरज आहे..

महिलांसाठीचा हा १ दिवस हि संकल्पना पुसून प्रत्येक दिवस महिलांचाच असेल. असं आपण करूच शकतो...

म्हणून म्हणते, वो स्त्री हैं जनाब वो कुछ भी कर सकती हैं.........

गौरी बैकर 

Tags:    

Similar News