बैल जोडी चालवणे ही पुरुषांची मक्तेदारी महिलांनी मोडीत काढली...

Update: 2023-01-18 13:31 GMT

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील शंकर पट प्रसिद्ध आहे. आज या ठिकाणी महिलांसाठीचा शंकरपट भरवण्यात आलेला होता. त्यामध्ये महिलांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली.

तळेगाव दशासर येथे दीडशे वर्षांपासून बैलांची शर्यत म्हणजेच शंकर पट भरवण्याची परंपरा आजही सुरू आहे. या शंकरपटात पुरुषांसोबतच महिला देखील भरधाव वेगाने बैलगाडी हाकतात. बैल जोडी चालवणे ही पुरुषांची मक्तेदारी असली, तरीही महिला देखील पुरुषांपेक्षा कुठे कमी नाहीत हे या निमित्ताने ग्रामीण भागातील महिला दाखवून देत आहेत.

महिलांचा शंकर पट पाहण्यासाठी अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात शंकर पट पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. अत्यंत चांगल्या पद्धतीने महिलांनी बैलजोडी शर्यतीमध्ये सहभाग घेऊन बैलजोडी हाकल्याचे इथे पाहायला मिळाले.

Tags:    

Similar News