किरकोळ चूक अन् 11 वर्ष खेट्या मारूनही महिलेला मिळेना पतीचे मृत्यू प्रमाणपत्र

Update: 2021-09-18 05:17 GMT

राजस्थानच्या दौसामध्ये एका महिलेला तिच्या पतीचा मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या 11 वर्षांपासून शासकीय कार्यालयांच्या खेट्या माराव्या लागत आहे. पीडित महिलेने खासदारांपासून ते अधिकारी, मंत्री, आमदार, शिपाई या सर्वांकडे मदत मागितली , परंतु या महिलेला तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळाले नाही.

पीडित महिला गुलाब देवी दौसा जिल्ह्यातील भंटा गावाच्या रहिवासी आहे. गुलाब देवी आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सतत धडपडत करतायत. आता हतबल झालेल्या गुलाब देवी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटच्या बाहेर उपोषणाला बसल्या आहेत.

पीडित गुलाब देवीच्या मते, तिचे पती जयराम मीना 2010 मध्ये विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशातील एका कंपनीत कामावर गेले होते. 20 सप्टेंबर 2010 रोजी त्यांचे निधन झाले. जयरामच्या मृतदेहाचे शवविच्छेदन 21 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते, परंतु एम्बलिंग सर्टिफिकेटमध्ये तेजारामऐवजी त्याच्या वडिलांचे नाव बलाराम असे नोंदवण्यात आले.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, नावात तफावत असल्याने या प्रमाणपत्राला काही अर्थ नाही. पीडिता आता विशाखापट्टणममधील रुग्णालयातून योग्य मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची आणि चुकीचे मृत्यू प्रमाणपत्र बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. यासाठी पडीत महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. पीडित आणि पीडितेच्या भावाने खासदार, मंत्री, अधिकारी यांच्यापासून शिपाईपर्यंत प्रत्येकाला आपली समस्या सांगून मदतीची विनंती केली, परंतु आजपर्यंत कोणीही पीडितेचे ऐकले नाही. त्यामुळे हतबल होऊन पिडीत महिला दौसा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली असून, आता समस्येचे निराकरण करेपर्यंत उठणार नसल्याचा त्यांनी निश्चय केला आहे.

Tags:    

Similar News