बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू; चार महिन्यांनतर पोलिसांनी घटनेची केली उकल

Update: 2021-07-28 04:56 GMT

पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा दरवाजातून खाली पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात बस चालकाच्या हलगर्जीपणामुळेच महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरवातील आकस्मिक मृत्यूची नोंद घेणाऱ्या पोलिसांनी तपासाअंती संबधित बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

महादेवी गोरख गायकवाड ह्या 29 मार्च 2021 रोजी पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांना डकी गावाच्या हद्दीतील धनलक्ष्मी वजन काट्याजवळील स्टॉपवर त्यांना उतरायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्याला उतरायचं असल्याचं सांगत बसच्या दारात येऊन उभ्या राहिल्या. दरम्यान आपला स्टॉप आल्यावर महादेवी यांनी उतरण्याचा प्रयत्न केला.

मात्र चालकाने बस न थांबवता तशीच पुढे नेली आणि त्यामुळे महादेवी यांचा तोल गेला व त्या बसमधून खाली पडल्या. बसमधून डोक्यावर पडल्याने त्यांना गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यात लोणी काळभोर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र पुढे तपास केला असता महिलेनं बस थांबवायला सांगूनही बस न थांबवल्यानं हा अपघात झाला असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

Tags:    

Similar News