ठाकरे-शिंदे एकत्र येणार?

Update: 2022-07-13 09:08 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातच मोठे बंड केले. शिवसेनेच्या इतिहासात कधीही घडले नाही असं बंड करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे यांच्यासोबत या बंडात एक-दोन नाही तर 40 हून अधिक आमदार सहभागी झाले. आता आमदारांचं झालं आता चर्चा सुरू आहे शिवसेनेतील खासदार देखील बंड करणार आल्याची. पण या सगळ्या चर्चा सुरू असताना अनेक स्थानिक नेते देखील शिंदे गटात सामील होत असल्याचं दिसत आहे.

तर शिवसेनेत पडलेल्या या फुटीमुळे अनेक शिवसैनिक सध्या नाराज आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत यासाठी आता शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद या मध्यस्थीची भूमिका बजावणार आहेत. यासाठी आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे.




 


राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणून उद्धव साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तशाच प्रकारचा पाठिंबा आदरणीय शिंदे साहेबांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून मिळावे या करीता शिंदे साहेबांनी मातोश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी यासाठी दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याच त्यांनी ट्वीट मध्ये म्हंटले आहे.




 दिपाली सय्यद यांनी घेतलेल्या मध्यस्थीच्या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे एकत्र येणार का? त्यांनी घेतलेल्या या भूमिकेला कितपत यश येणार? अशी चर्चा समाज माध्यमांवर आहे.

Tags:    

Similar News