वादग्रस्त विधान करणाऱ्या 'या' अभिनेत्रीला अटक होणार?

Update: 2021-09-10 03:25 GMT

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला तिचे वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चिन्हं आहेत.अभिनेत्री केतकी चितळे चा अटकपूर्व जामीन कोर्टानं नाकारला आहे. त्यामुळे तिला पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केतकी चितळेने एका विशिष्ट समजाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनतर तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१ मार्च २०२० रोजी तिने सोशल मीडिया वर नव बौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क अशी पोस्ट केली होती. या तिच्या पोष्टवर टीकेची झोड उठली होती. तिच्या याच विधानावर ॲड स्वप्नील कविता गोविंद जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात केतकी चितळे आणि सूरज शिंदे या दोघांवर अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (s)(u)(v) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या नंतर अटक पूर्व जामिनासाठी केतकी चितळे हिने ठाणे स्पेशल कोर्टात धाव घेतली होते. काल कोर्टाने केतकीच्या अटक पूर्व जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे आता तिला अटक होण्याची शक्यता आहे. यामध्ये ॲड अमित कटारनवरे यांनी युक्तिवाद केला. तसेच सोबत ॲड स्वप्नील जगताप ॲड आदी कटारनवरे ॲड सतीश अंकुश यांनी या केसमध्ये त्यांना मदत केली.

Tags:    

Similar News