कोरोनाची लस दंडावरच का घ्यावी?

Update: 2021-02-09 02:49 GMT

वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळ्या उपचार पध्दती आहेत. मात्र अनेकांना कोरोना लसीकरणावरून प्रश्न पडला आहे. कोरोना सारख्या माहाभंयकर आजारावर निघालेली लस ही दंडावरच का घ्यावी? खरंच तिचा प्रभाव लवकर होतो का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागची कारणं...

कोरोना तोंडावाटे किंवा नाकावाटे माणसाच्या शरिरात प्रवेश करतो. कोरोना संपुर्ण शरिरात पसरायला ५ ते १४ दिवसांचा वेळ घेतो. यात रूग्णाला ताप, सर्दी, खोकला, डोके दुखी आणि श्वास घ्यायला त्रास अशा गंभीर समस्या जाणवतात. यात रूग्णाला लवकरात लवकर योग्य उपचारांची गरज असते. कोरोनाची लस जर रूग्णाला वेळेत दिली नाही, तर रूग्णाला जास्त त्रास जाणवतो. शरिरातील अंतर्गत भागांना इजा होण्याची भीती असते.

आम्ही याबद्दल डॉक्टर अनुकूल सांगवीकर यांच्याशी बोललो असता. त्यांनी 'कोणत्याही आजाराच्या लसीकरणाची पध्दत ही त्या आजाराच्या तीव्रतेवर आणि लसीच्या समिकरणाशी संबंधित असते. जर एखादा आजार शरिरात हळू पसरणार असेल, त्यावर दिली जाणारी लस ही हळूहळू आजार कमी करणारी असते. मात्र जर आजार वेगाने पसरणारा असेल तर त्यावर दिली जाणारी लस ही वेगाने काम करणारी हवी, जसे शरिरात एखाद्या विटामिनची कमतरता आल्यानंतर ती भरून काढण्यासाठी हळूहळू काम करणारी लस कमरेवर दिली जाते, कुत्रा चावल्यानंतर रेबिजची लस ही पोटात दिली जाते. तसंच कोरोनाचा प्रभाव लवकर रोखता यावा तसेच रुग्णाच्या किंवा लस घेणाऱ्याच्या शरिरात लवकर ऍंटीबॉडिज तयार व्हाव्या यासाठी कोरोनाची लस दंडावर दिली जाते.' अशी प्रतिक्रिया दिली.

आम्ही याबाबतीत डॉक्टर रिचा गुप्ता यांचं मत विचारलं त्यावर त्यांनी 'कोरोना लस ही शरिरात लगेच प्रभाव देते, तसंच ती पचायला हलकी असल्याने लस ही कमरेवर न घेता दंडावर देण्यात येते. ज्याने रूग्णाच्या शरिरात या लसीचे लवकर परिणाम दिसातात. आणि ऍंटीबॉडिज तयार होतात.' अशी प्रतिक्रिया दिली.

Tags:    

Similar News