दरवर्षी मिळतात २०००० ! कसे कुणाला आणि कशासाठी?

Update: 2023-02-22 10:01 GMT

पदवीपर्यंतच शिक्षणं घेतलेला एक वर्ग असतो.या वर्गाला सुशिक्षित म्हणून गणलं जात. यामद्ये पदवी मिळाल्यांनतर डोक्यावरची टोपी उडवून आनंद सुद्धा साजरा करताना आपल्याला तरुणाई दिसते(convocation ceremony photos ) पण पदवीच शिक्षण पूर्ण होईपर्यंत डोक्यावरची कामाची टोपली उडवून आनंद साजरा करणारी कामगार महिला किंवा त्यांची मुलं दुर्मिळच (women labour photos )खरंतर हि विषमता संपण्यासाठी शिक्षण परवडलं पाहिजे(money and education collage image ).म्हणूनच बांधकाम कामगारांची मुलं किंवा त्यांची पत्नी यांना पदवीपर्यंतची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य यासाठी दरवर्षी २०००० रुपये आर्थिक मदत देणारी योजना आहे.बांधकाम कामगाराच्या २ मुलांना किंवा त्याच्या पत्नीस योजनेचा लाभ घेता येतो .प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षांसाठी प्रतिवर्षी २०००० रु दिले जातात .

त्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत जी खालीलप्रमाणे आहेत

नोंदणी पावती

मंडळाचे ओळखपत्र

बँकेचे पासबुक

रहिवासी पुरावा जस कि रेशन कार्ड, लाईट बिल

शाळेत शिकत असल्याबाबतची बोनाफाईड दाखल्याची मूळ प्रत

कामगाराच्या नावे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड

पासबुक

तसेच मुलाचे शाळेचे ओळखपत्र

मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक

शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पावत्या

शैक्षणिक साहित्य खरेदीच्या पावत्या सोबत जोडाव्या लागतात .

या योजनेची अधिक माहिती mahabocw.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Tags:    

Similar News