खुशबू सुंदर यांनी भाजप प्रवेशानंतर मागितली कॉंग्रेसची माफी

Update: 2020-10-16 10:08 GMT

राहुल गांधी यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खुशबू सुंदर यांनी सोमवारी सकाळीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्याच दिवशी भाजपात प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चेन्नईमध्ये त्यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस पक्ष सोडल्याने टीका करणाऱ्यांना उत्तर देताना खुशबू यांनी म्हटलं होतं की, "मी काँग्रेसमध्ये मागील सहा वर्षांपासून होतो. मी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मी पक्ष सोडल्यानंतर मला तो मानसिक संतुलन बिघडलेल्यांचा पक्ष होता असं मला जाणवलं".

खुशबू सुंदर यांच्या वक्तव्याविरोधात तामिळनाडूमधील जवळपास ३० पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. आपली चूक लक्षात आल्यानंतर खुशबू यांनी लगेचच माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागणारं निवेदन प्रसिध्द केलं असून यात आपण घाईत आपल्याकडून वापरण्यात आलेल्या शब्दांबद्दल माफी मागितली आहे. आपण वापरलेले शब्द चुकीचे असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. माझ्या कुटुंबातील काही सदस्य तसंच मित्रही मानसिक तणावाशी झगडत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. यापुढे कोणत्याही कारणास्तव पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये याची आपण खात्री बाळगू असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे.

दरम्यामन, खुशबू यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं. "काळानुसार मला जाणवलं की देशाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या व्यक्तीची आवश्यकता आहे,ठ असं खुशबू सुंदर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर म्हटलं.

Tags:    

Similar News