क्लिकबेट साठी वेब पोर्टलने सोडली लाज..

आता तुम्ही या बातमीचा जो मथळा वाचत आहात हा सगळा clickbait चा प्रकार आहे. बातमीला काहीही मथळे देऊन लोकांना येडे तर बनवले जातेच पण एखाद्या महिलेविषयी असं काहीही मथळे देणे योग्य आहे का?

Update: 2022-06-20 09:28 GMT

आमिर खानच्या मुलीने सोडली ला'ज, बॉयफ्रेंड सोबत बेडरूमम व्हिडीओ झाला लीक... असं हेडिंग देऊन MarathiMaaj.in या वेब पोर्टलने ही बातमी केली आहे. खरंतर असे मथळे दिले जातात लोकांना आकर्षित करण्यासाठी. असे आकर्षक मथळे करायचे आणि लोकांनी बातमी वाचण्यासाठी क्लिक केल्यानंतर आत मात्र भलतीच माहिती द्यायची किंवा शाब्दिक खेळी करत लोकांना फक्त त्या बातमीवर क्लिक करण्यास भाग पाडायचं असा हा प्रकार आहे.

आता यांनी केलेल्या बातमीचा मथळा तुम्ही वाचला तर साहजिकच अनेकजण हा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करतील. पण या बातमीत कुठेही तिचा व्हिडिओ नाही. जवळपास सातशे ते आठशे शब्दांची ही बातमी आहे. तर या बातमीत नक्की काय आहे हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. इरा खानने तिच्या बॉयफ्रेंड सोबत काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले होते. त्या फोटोंबद्दलच ही बातमी करण्यात आली आहे. या मध्ये सगळ्यात शेवटच्या परिच्छेदामध्ये ही बातमी काय आहे हे सांगण्यात आले आहे. त्यात म्हंटल आहे की, इरा आपल्या बेडरूम मध्ये ती तिचा बॉयफ्रेंड नुपूर शेखरे सोबत दिसत आहे. फोटो मध्ये तिने बाथरोब घातला असून 'मॅचिंग रॉब्स, डेट नाईट' असं कॅप्शन टाकत हा फोटो शेअर केला आहे. यापूर्वी देखील तिने आपल्या बेडरूममधील असे फोटो शेअर केले आहेत. आपल्या बेडरूममध्ये अगदी आरामदायक अशी या जोडप्याची हटके स्टाइल चाहत्यांना खूप जास्त आवडते.

आता ही संपूर्ण बातमी काय आहे हे देखील पहा..

https://marathimaaj.in/amir-chya-muline-sodli-laaj-boyfriendsobt-bedroom-viddo-share/?fs=e&s=cl#l4md72rqopeb2zmt5o

बस इतकीच काहीशी ही बातमी आहे. आता फक्त हे एकच वेब पोर्टल आहे का की जे अशा बातम्या करतात तर अजिबात नाही अशा क्लिक बेट मिळवण्यासाठी असे मथळे करणाऱ्या अनेक बातम्या समाजमाध्यमांवर तुम्हाला दिसतील. पण मथळ्यात दिलेली बातमी जर तपशीलात नसेलच तर आपण देखील आपला वेळ वाया का घालवायचा. या अशा ट्रिक्स सध्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक माध्यम समुह आपली बातमीच सर्वाधीक वाचली जावी याकरीता वापरत असतं. पण या सगळ्याची हद्द या वेब पोर्टलने पार केली. एका मुलीच्या बाबतीत न घडलेली घटना मथळ्यात टाकून मीठ मसाला लावून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा घाट या संकेतस्थळाने केला आहे. अशा मर्यादा ओलांडलेल्या अशा क्लिक बेट वाल्या बातम्यांचा आम्ही भांडाफोड करणार आहोत.

Tags:    

Similar News