रिक्षावाल्याच्या पोस्टरमुळे प्रशासनाला धक्का बसणार..

Update: 2022-07-17 10:03 GMT

आता पावसाळा सुरु झाला कि सर्वांना एका मोठ्या समस्येला समोर जावं लागत ते म्हणजे शहरात असणारे खराब रस्ते. अगदी पावसाळ्यापूर्वी नवीन बनवलेले रस्ते सुद्धा एखाद्या मोठ्या पावसात पार धुऊन जातात. अनेक नागरिकांना या खड्यांमुळे आपला जीव देखील गमवावा लागतो. आता कितीही जीव गेले कितीही अपघात झाले तरी प्रशासनाला या खड्यांवर काहीच करावं वाटत नाही हा भाग वेगळा. पण एक गोस्ट खरी आहे ती म्हणजे, तुम्ही आता कुठेही जा रस्त्यावर तुम्हाला खडे दिसणार नाहीत असं पाहायला मिळणार नाही. याच खाड्यांमुळे त्रस्त झालेल्या एका रिक्षावाल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे. काय आहे हि चर्चा, तर एका रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षाच्या पाठीमाणे एक पोस्टर लावले आहे. या पोस्टर वर त्याने जनतेला एक प्रश्न देखील केला आहे आणि त्याच खरं खरं उत्तर देखील त्यानेच दिले आहे.

रिक्षावर असलेल्या पोस्टर वर असं नक्की काय आहे?

तर या पोस्टर लिहिलं आहे कि, पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? याच्या उत्तराला दोन ऑप्शन दिले आहेत. पहिला आहे मीठ व दुसरा आहे साखर. आता तुम्ही याचे उत्तर मीठ किंवा साखर असं द्याल. पण या रिक्षाचालकाने याचे उत्तर डांबर असे दिले आहे. या रिक्षावर असणाऱ्या या पोस्टर चा फोटो आता समाजमाध्यमांवर जोरात व्हायरल होतो आहे. तर हि रिक्षा कोल्हापूर शहरातील आहे.  अगदी सर्वसामान्य लोकांपासून सर्वजणच या रस्त्यांवरील खाड्यांमुळे त्रस्त झाल्याचे आपणास पाहायला मिळते आहे.




 


Tags:    

Similar News