फोक्सवॅगनची पोलो लीजेंड लॉन्च; काय असेल किंमत पहा..

फोक्सवॅगनने पोलो गाडीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पोलो लीजेंड लॉन्च केली आहे. फोक्सवॅगनने पोलो लीजेंड एडिशनमध्ये काही बदल केले आहेत काय आहेत नवीन बदल पहा..

Update: 2022-04-05 05:39 GMT

फोक्सवॅगनने पोलो हॅचबॅक, पोलो लीजेंडचा नवीन मर्यादित प्रकार लॉन्च केला आहे. फोक्सवॅगन पोलो लीजेंड प्रकार GT TSI प्रकारात उपलब्ध असेल. हे 1.0-लिटर TSI इंजिन या गाडीत आहे जे 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेले आहे. हे इंजिन 110Ps आणि 175Nm टॉर्क जनरेट करते. या लिमिटेड एडिशन पोलोची एक्स-शोरूम किंमत 10.25 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.45 लाख रुपये आहे.

पोलो हॅचबॅकची हु नवीन गाडी १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लॉन्च करण्यात आली आहे. पोलो ही स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये ड्युअल एअरबॅगसह ऑफर केलेली पहिली मेड-इन-इंडिया हॅचबॅक आहे. 2014 मध्ये, ग्लोबल NCAP द्वारे याला 4-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे.

या गाडीची डिझाइन काशी आहे?

फोक्सवॅगनने पोलो लीजेंड एडिशनमध्ये काही बदल केले आहेत जे प्रकारांपेक्षा वेगळे आहेत. स्पेशल एडिशन पोलो फेंडर्स आणि बूट बॅजवर "लीजेंड" असे लिहिलेले आहे. याला स्पोर्टि लुक देण्यासाठी साइड बॉडी ग्राफिक्स, ब्लॅक ट्रंक गार्निश आणि ब्लॅक रूफ फॉइल देखील देण्यात आला आहे.

Tags:    

Similar News