virginity test: कौमार्य चाचणीनंतर नववधूंना माहेरी पाठवले…

पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार समोर आहे. कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावंडाशी लावून देण्यात आला होता. त्यानंतर नवरदेवाकडच्या मुलांच्या घरच्यांनी विवाहाच्या पहिल्याच रात्री या दोन्ही तरुणींची कौमार्य चाचणी केली. 

Update: 2021-04-11 10:48 GMT

कळस म्हणजे या चाचणीत दोन्ही तरुणी नापास ठरल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढला. या दोनही मुलींचं आयुष्य उद्धस्थ करण्याचा निर्णय या जात पंचायतीने घेतला. कायद्याने जातपंचायतीने बंदी घालण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला नांदवणार नाही असं जात पंचायतीमार्फत सासरच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे कौमार्य चाचणी करणाऱ्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

 हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं. अखेर दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाचं म्हणजे यापैकी एक नवरदेव हा भारतीय सैन्य दलात असून, त्याने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या दोन्ही तरुणी सध्या कोल्हापूरमध्येच वास्तव्याला आहेत.

Full View

Tags:    

Similar News