#BappiLahiri ; डिस्को किंग बप्पी लहरी यांचे निधन..

Update: 2022-02-16 04:52 GMT

बॉलिवूडचे संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी काल रात्री ११ वाजता निधन झाले. मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बप्पी दा गेल्या वर्षी कोविड पॉझिटिव्ह झाले होते व यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी लहरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग (Disco King) म्हटले जात होते. त्यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते. बप्पी लाहिरी हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्याचे कपडे (Golden Man) घालण्याच्या शैलीसाठी ओळखले जात होते.

बप्पी लहरी यांच्या मृत्यूनंतर जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांचे अधिकृत निवेदन जारी केले आहे. बप्पी दा ओएसए-ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि वारंवार छातीत संक्रमणाने ग्रस्त होते. त्यांच्यावर डॉ. दीपक नामजोशी उपचार करत होते. त्यांना 29 दिवस जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर 15 फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, घरी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना गंभीर अवस्थेत जुहूच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आणि रात्री 11.45 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. गेल्या एक वर्षापासून ते ओएसएने त्रस्त होते.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहताना पीएम मोदींनी लिहिले - बप्पी लहरी जी यांचे संगीत सर्वांगीण होते, ते प्रत्येक भावना सुंदरपणे व्यक्त करायचे. प्रत्येक पिढीतील लोकांना त्यांच्या कार्याशी जोडले गेले आहे. त्याचा प्रसन्न स्वभाव सर्वांच्या स्मरणात असेल. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना.

Tags:    

Similar News