वैद्यनाथ अर्बन बॅकेच्या अधिकाऱ्याला अटक; पंकजा मुंडेंना झटका

Update: 2021-09-04 09:15 GMT

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शंभू महादेव साखर कारखान्याच्या 46 कोटी रुपयांच्या साखर घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं पंकजा मुंडे यांना हा झटका समजला जात आहे.

उस्मानाबादच्या सावरगाव मधील शंभू महादेव साखर कारखान्याने परळी मधल्या वैद्यनाथ बँकेकडे तारण म्हणून 46 कोटी रुपयाची साखर ठेवली होती. याच घोटाळ्याप्रकरणी कळंब पोलीस स्टेशन मध्ये शंभू महादेव साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी यापूर्वी एकास अटक झाली होती, आता ही दुसरी अटक करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News