या रेल्वे स्थानकाला मिळालं झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव!

Update: 2022-01-01 10:22 GMT

 उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यापासून अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. आता देखील नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून उत्तरप्रदेशमधील झाशी रेल्वेस्थानक आता वीरांगना लक्ष्मीबाई स्थानक या नावाने ओळखलं जाणार आहे. याबद्दलची ट्विट देशाचे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विटरवर केलं आहे. त्यात ते म्हणाले आहेत, "झाशी रेल्वे स्थानक आता वीरांगना लक्ष्मीबाई स्थानक या नावाने ओळखलं जाईल."

उत्तर प्रदेश सरकारने तीन महिन्यांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या नामबदलाचा प्रस्ताव पाठवला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव मान्य करत या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. या नाम बदलानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला याचा फायदा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

या आधी सरकारने कोणकोणती नावं बदलली होती?

योगी सरकारने त्यांच्या कार्यकाळात अनेक शहरांची नावे बदलली. यात त्यांनी फैजाबादचे अयोध्या, अलाहाबादचे प्रय़ागराज आणि मुघलसरायचे दीनदयाल उपाध्याय नगर अशी शहरांची नावे बदलली आहेत.

Tags:    

Similar News