नाशिकमध्ये ड्रेसच्या वादावरून दोन मुलींमध्ये हाणामारी, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Update: 2022-01-02 07:03 GMT

नाशिकमधील एका शाळेतील दोन विद्यार्थिनींमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. शाळेच्या मैदानात दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. ही फ्रीस्टाइल फाईट कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एका नामांकित शाळेच्या पटांगणात ही घटना घडली. यादरम्यान दोन विद्यार्थिनींमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवण्याऐवजी घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी त्याचा व्हिडिओ बनवत होते. मात्र, काही वेळाने दोघांचे काही मित्र पुढे आले आणि त्यांनी दोघांना वेगळे केले. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉलेजने दोघांनाही ताकीद देऊन सोडले.

ड्रेरेसवरून या दोन् मुलींमध्ये वाद झाला. प्रकरण इतके वाढले की त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सध्या सोशल मीडियावर दोघांमधील या भांडणाच्या व्हिडीओला WWF असा हॅशटॅग वापरला जात आहे. कॉलेज प्रशासनाच्या वतीने दोन्ही विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना बोलावून सूचना करण्यात आल्या आहेत.

Full View

Tags:    

Similar News