Twitter ला 900 रुपये देऊन काय काय मिळणार ?

Update: 2023-02-11 06:50 GMT

ब्ल्यूटिक साठी कितीही फॉलोवर्स असले तरी ट्विटर वापर करता नेहमी उत्सुक असतोच, पण तुम्हाला माहिती आहे का निळ्या चिन्हासाठी म्हणजेच ब्ल्यूटिक साठी महिन्याला 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

भारतातील twitter वापरकर्त्यांना मोबाईलवर निळे चिन्ह मिळवण्यासाठीच म्हणजे ब्लु टिक साठी महिन्याला ₹900 द्यावे लागणार आहेत .तर वेबवरील वापरकर्त्यांना महिन्याला 650 इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का हे शुल्क तुम्ही दिल्यानंतर ज्या वापरकर्त्यांना ब्युटिक मिळेल त्यांना कमी जाहिराती सह काही सवलती सुद्धा देण्यात येणार आहेत. इलोन मस्क सगळ्यांनाच माहिती आहे ,इलोन मस्क यांनी ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर ब्ल्यूटिक साठी शुल्काची घोषणा केली होती .त्यामुळे तुम्हाला जर आता ब्लूटिक मिळाली असेल किंवा मिळवायची असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा....

अनपेड ब्लू टिक्सचे काय होईल?

एक प्रश्न लोक पुन्हा पुन्हा विचारत आहेत की ज्यांच्याकडे आधीच ब्लू टिक आहे किंवा ज्यांनी सबस्क्रिप्शनशिवाय ब्लू टिक घेतली आहे त्यांचे काय होईल? इलॉन मस्कने याबाबत आधीच स्पष्ट केले आहे, प्रत्येकाची ब्लू टिक काढली जाईल. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतरच यूजर्सला ट्विटर ब्लू टिक मिळेल.

हे नवीन फिचर लागू झाल्यानंतरच शुल्क न भरलेल्या ब्लू टिक्स काढल्या जातील. यास काही वेळ लागू शकतो. मग जर तुम्हाला ब्लू टिक हवी असेल तर तुम्हाला ट्विटरचे पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

Tags:    

Similar News