यंदा भाकरी फिरणार… सुनेत्रा वहिनीच…,अजित पवार गटाचा समाज मध्यमांवर प्रचार

Update: 2024-03-03 10:44 GMT

बारामतीच्या वहिनी सुनेत्रा पवार आणि बारामतीच्या ताई सुप्रिया सुळे या दोघी नणंद भावजाया यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमने सामने दिसणार असल्याचं चित्र पुढे येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची जरोदार तयारी अजित पवार गटाकडून होत असून, तर शरद पवार गट सुद्धा काही मागे नाही. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विजयाची तुतारी वाजवली जात आहे . अशात पहिल्यांदाच बारामतीतील लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पवार विरूद्ध पवार असा सामना रंगताना दिसणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडलेली असताना पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्येच पवार कुटुंबात थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही म्हटले जात आहे.




 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचं घडयाळ आता शरद पवारांच्या हातात नसून अजित पवारांच्या हातात असल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्हं दिलेल आहे. येणारी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गट तुतारी वाजवणारा माणूस याच निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झाल आहे. दरम्यान, गेल्या काही तासांपूर्वी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुतारीचं स्टेटस ठेवत प्रचार सुरू केला होता.

अजित पवार यांच्या गटाकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही म्हटले जात आहे. अशातच आता बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचे स्टेटस ठेवण्यात आले आहे. तर यंदा भाकरी फिरणार, यंदा विकासाच्या जोरावर सुनेत्रा पवार खासदार होणार…बारामतीच्या अजित पवार गटातील कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर स्टेटस टाकून सुनेत्रा पवार यंदा खासदार होणार असल्याची घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा भाकरी फिरणार आणि बारामतीला खासदार ही मिळणार पण त्या खासदार ताई आसणार की वहिनी असणार हे बारामतीकर ठरवणार 

Tags:    

Similar News