श्रमिकांनी पंतप्रधान मोदींचं विधान खोडून काढलं, म्हणाले, "आम्ही आमच्या मर्जीने गावी गेलो!"

Update: 2022-02-08 10:51 GMT

 संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान कोरोना काळात श्रमिकांना जबरदस्तीने गावी पाठवल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारवर केला. या आरोपांबाबत मुंबईतल्या परप्रांतीय श्रमिकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

सध्या संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर गेले काही दिवस चर्चा सुरू आहे. या भाषणावर चर्चा करताना कोरोना काळात युपी बिहारच्या लोकांना महाराष्ट्र सरकारने जबरदस्तीने ट्रेनमध्ये बसवून आपापल्या राज्यात पाठवलं. आमच्यावरचा बोजा हलका करा आणि आपल्या राज्यात जाऊन कोरोना पसरवा असं म्हणत श्रमिकांना हाकलल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र सरकारवर केला. त्यांच्या या आरोपाबद्दल मुंबईतल्या श्रमिकला नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

त्यावेळी काही श्रमिकांनी, महाराष्ट्र सरकारने आम्हाला कायम सहकार्य केलं आहे. कोरोना काळात देखील त्यांनी आम्हाला गावी जाण्यास मदत केली होती. आम्ही आमच्या गावी गेलो होतो. ज्यांना गावी जायचं नव्हतं त्यांची देखील योग्य पद्धतीने राज्य सरकारनं सोय केली होती अशी प्रतिक्रिया मॅक्स वुमन शी बोलताना दिली. काही श्रमिकांनी जर आम्हाला यूपीमध्ये दहा हजाराची नोकरी मिळाली असती तर आम्ही मुंबईत, महाराष्ट्रात आलो नसतो. अशी देखील प्रतिक्रिया दिली.

Tags:    

Similar News