मृत्यूशी झुंजणार्‍या मुलाला वाचवण्यासाठी पालकांची मदतीसाठी आर्त हाक..

पालकाची दानशूर व्यक्तींना तसेच संस्थांना मदत करण्याची आर्त हाक..

Update: 2021-08-12 04:01 GMT

औरंगाबादच्या बकवालनगर नायगाव येथे राहणारा आठ वर्षीय चेतन राहुल शिरसाट हा "गुलियन बॅरो सिंड्रोम" आजाराशी झुंजत असून संजीवनी बाल रुग्णालय औरंगाबाद येथे उपचार घेत आहे .... उपचाराचा खर्च हा "महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने" मध्ये बसत नसल्याने हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या शिरसाट कुटुंबा पुढे हॉस्पिटल चे होत असलेले बिल चुकते करण्याचे करण्याचे मोठे संकट उभे ठाकले असून दानशूर व्यक्तीनी तसेच संस्थांनी हॉस्पिटलच्या होणाऱ्या बिलाची रक्कम भरण्यासाठी मदतीचा हात द्यावा अशी आर्त हाक चेतनाच्या वडिलांनी दिली आहे.

चेतन हा झोका खेळत असताना जमिनीवर पडला असता अवयवाच्या काहीही हालचाली होत नसल्याने चेतनच्या पालकानी काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार केले चेतनच्या तब्येतीत तीळमात्रही सुधारणा होत नसल्याने आणि चेतनच्या च्या तोंडातून फेस येत असल्याने डॉक्टरानी औरंगाबाद येथील संजीवनी हॉस्पिटल मध्ये नेण्याचा सल्ला दिला बालकासाठी नावलौकिक असलेल्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये चेतनच्या चाचण्या केल्या नंतर त्याला "गुलियन बॅरो सिंड्रोम"नावाच्या आजाराने ग्रासल्याचं निदर्शनास आहे. चेतनवर संजीवनी हॉस्पिटल औरंगाबाद येथे आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर लावून तज्ञ डॉक्टरांच्या निगराणी खाली उपचार चालू आहेत. उपचाराला लागणारा खर्च हा चार लाखाच्या वर जात असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कढून अवघे 30000 रुपये उपलब्ध झाल्याने आणि आजाराचा उपचाराचा खर्च "महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने"मध्ये बसत नसल्याने हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबापुढे आपल्या मुलावर उपचार करत असलेल्या हॉस्पिटलचे बिल चुकते करण्याचे मोठे संकट उभे ठाकले असून उपचार देणाऱ्या आणि मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या हॉस्पिटलच्या बिलाची रक्कम भरण्यासाठी पालकानी दानशूर व्यक्तींना तसेच संस्थांना मदत करण्याची आर्त हाक दिली आहे.

Tags:    

Similar News