राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढल्यानं चिंता वाढली; प्रशासनकडून काळजी घेण्याचे आवाहन

Update: 2021-10-10 06:14 GMT

देशात आणि राज्यात कोरोनाची लाट ओसरत असल्याचे पाहायला मिळत असतांना, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

काल समोर आलेल्या आकडेवारीनुसार, अहमदनगरमध्ये शुक्रवारी 340 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 162 रुग्ण सापडले आहेत. तसेच साताऱ्यातही 102 बाधित रुग्णांची आज नोंद झाली असून पुण्यात 264 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेषत: या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही तिसरी लाटेचा धोका कायम आहे. विशेष म्हणजे काही देशांमध्ये तिसरी लाटेची जाणीव होत असल्याचं सुद्धा बोलले जात आहे.

Tags:    

Similar News