भुसावळ विभागातलं पहिलं "पिंक स्टेशन" सुरू

Update: 2023-08-09 14:50 GMT

मध्य रेल्वेच्या नवीन अमरावती स्थानकाने भुसावळ विभागातील पहिले स्टेशन बनण्याचा मान पटकावलाय. 'पिंक स्टेशन' म्हणून ओळखले जाणारे मध्य रेल्वे नेटवर्कमधील तिसरे स्थानक बनण्याचाही मान अमरावतीला मिळालाय.

पिंक स्टेशन म्हणजे या स्टेशनवरील व्यवस्थापन हे संपूर्णपणे महिला कर्मचारी-अधिकारीच करतात. महिलांनाही समान संधी मिळावी, हा या पिंक स्टेशनमागचा खरा उद्देश आहे. 'पिंक स्टेशन' म्हणून नवीन अमरावती स्थानक मुंबई विभागातील माटुंगा स्थानक आणि नागपूर विभागातील अजनी स्थानकाच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.

मध्य रेल्वेने आपल्या कर्मचार्‍यामधील महिलांच्या प्रगतीसाठी व महिला-व्यवस्थापित स्थानकात रूपांतर करून, भुसावळ विभागातील 'पिंक स्थानक' म्हणून त्याच्या प्रवासाची सुरुवात करून एक महत्त्वाची झेप घेतली आहे. नवीन अमरावती स्थानकाचं संपूर्ण काम हे समर्पित महिलांच्या टीमद्वारे व्यवस्थापित केले जाते. कर्मचार्‍यांमध्ये 12 महिला कर्मचारी आहेत. यात चार उप स्टेशन अधीक्षक, चार पॉइंटवुमन्स, तीन रेल्वे संरक्षण कर्मचारी आ mणि एक स्टेशन तिकीट बुकिंग एजंट यांचा समावेश आहे. स्टेशनवर दररोज अंदाजे 380 प्रवासी येतात आणि दररोज 10 ट्रेन धावतात.

Tags:    

Similar News