सोन्यासरखं पीक समाजकंटकांनी उपटून फेकलं; महिला शेतकऱ्याने शेतातच हंबरडा फोडला

Update: 2021-08-05 10:37 GMT

आधीच दुष्काळ, अतिवृष्टी चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नेहमीच नवनवीन संकट उभे असतात. जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी येथील मीराबाई उत्तम गायकवाड यांच्यावर सुद्धा असेच संकट कोसळले आहे.शेतात दीड ते दोन एकर मध्ये लावलेल्या कपाशीच पीक अज्ञात लोकांनी उपटून फेकल्याने मीराबाई अडचणीत सापडले आहे. तर आपलं सोन्यासारख पीक उपटून फेकून दिल्याने मीराबाई चा अश्रूंचा बांध फुटला आणि शेतातच हंबरडा फोडला.

आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा स्वतःला सावरत जगण्याची धरपड करतोय. तशीच काही घरपड मीराबाई यांची सुरू होती. शेतात दिवसभर काबाडकष्ट करून पिकांना आपल्या मुलाबाळाप्रमाणे जतन केल्यानंतर गुढग्याएवढं आलेलं पीक डोळ्यासमोर उपटून पडलेलं पाहून मीराबाई धायमोकलून रडू लागल्या. त्यांचं हे रडणं पाहून गावकरी सुद्धा भावूक झाले होते.

मीराबाई ह्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यामुळे राजकीय द्वेषापोटी मीराबाईंच्या पिकाचे नुकसान करण्यात आल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कारवाई व्हायलाच पाहिजे,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Tags:    

Similar News