या गावात घरटी 'रेडा' सांभाळला जाते, कारण काय असेल पहा..

Update: 2022-06-12 06:45 GMT

पूर्वी प्रत्येक खेड्या पाड्यात औतासाठी  रेड्यांची जोडी जुंपली यायची त्यासाठी शेतकऱ्याच्या घरी रेड्याची जोडीचा हमकास सांभाळ केलेला दिसून यायचा. शेतीच्या नांगरटीसाठी ,भात लागणीचा चिखल करण्यासाठी , वैरण , पिके आणण्यासह इतर कामांसाठी शेतकरी रेड्यांचा वापर करायचे.  रेड्यांचा  जिवापाड सांभाळ करायचे. आत्ता मात्र दुग्ध क्रांती झाल्यापासून गावठी रेड्यांची संख्या कमी झाली आहे. म्हैस व्यायल्यानंतर रेडा झाल्यास अवघ्या पंधरा ते वीस दिवसात त्याची विक्री केली जाते. तर चिखली गुठ्ठा व पळण्याच्या शर्यतीमुळे बैल जोड्यांची संख्या टिकून आहे. एकीकडे रेड्यांची संख्या कमी होत असताना पन्हाळा तालुक्यातील एका धनगरवाड्यावर  मात्र प्रत्येक  घरात औतासाठी  रेड्यांचं जोडीचे संगोपन केले जात आहे.

पूर्वी घरच्या  म्हैशीच्या रेड्यांचे संगोपन करून औतासाठी वापर केला जायचा. बैलांपेक्षा स्वस्त दरात मिळणारे रेडे  गोरगरीबांना आधार होते. आत्ता मात्र ती परिस्थिती राहिलेली नाही. हल्ली म्हैस व्यायल्यानंतर रेडी झाल्यास   भविष्यात दूध मिळेल या अपेक्षेने सांभाळली जाते . तर  रेडा झाल्यास त्याची पंधरा वीस दिवसातच विक्री केली जाते. त्यामुळे गावठी रेड्यांची संख्या कमी होवू लागली आहे. यांत्रिकीकरणामुळे ग्रामीण भागात ट्रॕक्टर , पॉवर ट्रेलरने जमीनीची नांगरट व चिखल केला जातो. यासह विविध कारणांनी रेड्यांच्या संगोपनाकडे पाठ फिरवली जात आहे. त्यामानाने बैल जोड्यांची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते. मात्र याला अपवाद ठरला आहे तो पन्हाळा तालुक्यातील गोठणे पैकी धनगरवाडा.

इथल्या प्रत्येक घरात शेतीकामासाठी  रेड्यांच्या जोडीचा सांभाळ केला जात आहे. इथं एकही बैलाचे औत  नाही हे विशेष. तर गेली पन्नास वर्षापासून या गावात एकाही घरामध्ये बैलाची जोडी पहावयास मिळालेली तर नाहीच पण बैलाचे औतही येतील शेतामध्ये नांगरट करताना दिसत नाही. पन्नास वर्षापासूनची परंपरा या गोटणे-धनगरवाडीने सांभाळली आहे. रेड्याची जोडी अथवा एखादा रेडा जर वयोमानानुसार म्हातारा झाला तर तो रेडा विकून लगेच नवीन रेडा घेतला जातो. पण बैल मात्र घेत नाहीत. बैल जर सांभाळला तर त्याची निगा वेळोवेळी जास्त प्रमाणात करावे लागते. त्याला वेळोवेळी वैरण घालने वेळोवेळी धुणे असे प्रकार करावे लागतात. पण रेड्याचे तसे काहीच नाही शेतातील नांगरटीचे काम पूर्ण झाले की रेड्याला जंगलात चरायला सोडून दिला जातो. चरून पोट भरले की तो रेडा आपोआप मालकाच्या घरी येऊन गोठ्यामध्ये थांबतो. त्यामुळे बैलापेक्षा रेडाच बरा अशी म्हणण्याची वेळ या गोटणे गावच्या धनगर वाड्यातील शेतकर्‍यांना आली आहे.

Tags:    

Similar News