2 दिवसांची नवी नवरी रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळाली

Update: 2022-04-03 13:55 GMT

लग्नाचा सिझन सध्या सुरू झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेलुद येथील शेतकरी परिवारामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नव वधु सोबत दोन दिवसापूर्वी परिसरातील एका मंदिरात विधीवत लग्न लावून दिले, आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू रात्रीच्या वेळी रोख रक्कम व अंगावरील डाग दागिने घेऊन असे अंदाजे तीन लाख रुपयांचा शेलुद येथिल काकडे परिवाराला गंडा देऊन फरार झाली आहे, याप्रकरणी राजू दौलत काकडे यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस स्टेशन मध्ये नव वधु विरुद्ध खरे नाव अद्याप माहीत नसल्यामुळे व तिचे पाच सहकारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहे.


आरोपीचा शोध पोलीस घेत आहे, व या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहे. याप्रकरणी तालुक्यात या टोळी विरुद्ध प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे की भोळ्याभाबड्या शेतकरी परिवारांना या टोळ्या लग्नाचे आमिष दाखवून नवरी पाहून देतो म्हणून लग्न लावून देतात व अवघ्या दोन तिन दिवसातच नवरी रोख रक्कम घेऊन फरार होते या फसवेगिरी करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहे.

Tags:    

Similar News