सुषमा अंधारे आणि संजय गायकवाड.... वाद पेटला

Update: 2024-02-05 14:03 GMT

शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात पुन्हा जुनाळी पेटली आहे. गायकवाड यांनी अंधारे यांच्यावर टीका करताना "सुषमा अंधारेसारख्या महिलेच्या आरोपावर उत्तर देणार नाही. सती-सावित्रीसारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो," असे म्हणून वाद निर्माण केला आहे.

या विधानाचा ठाकरे गटाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांनी गायकवाडांच्या शब्दांना कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, "गायकवाडांची भाषा अत्यंत घाणेरडी आणि संसदीय परंपरेला साजेशी नाही. लोकप्रतिनिधींनी अशी भाषा वापरणे बिलकुल योग्य नाही," अस सुषमा अंधारे म्हटल्या आहेत.

छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांना अशी भाषा वापरणं किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल अशी भाषा वापरणं हे चुकीचं आहे. लोकप्रतिनिधी इतकी गलिच्छ भाषा वापरत असेल तर एकनाथ शिंदेंनी बेलगाम झालेल्या आणि मुजोर, माजोर्डेपणा करणाऱ्या आमदारांना लगाम घालण्याची गरज आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. त्यावर गायकवाड यांनी वरीलप्रमाणे आक्षेपार्ह विधान केले आहे.

गायकवाडांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि संजय गायकवाड यांचा वाद पुन्हा एकदा पेटला असून, या सर्व वादावरून सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया येईल? ते गायकवाडांच्या विधानाचे समर्थन करतील की निषेध करतील? हे पाहणे बाकी आहे.

Tags:    

Similar News