शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर शिवसेना पदाधिकाऱ्याने हसत-हसत टाळले उत्तर...

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने ऊस पेटवून देत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यावर शिवसेनेच्या पदाधिकारी आयोध्या पौळ यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी अगदी हसत हसत या राजकीय भूमिका मांडण्यासाठी मी इथे आले नाहीये. या राजकीय विषयावर बोलण्यासाठी आमच्या पक्षातील अनेक हुशार मंडळी बसलेली आहेत. ते यावर नक्कीच बोलतील असे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी आत्महत्येसारख्या प्रश्नावर इतकी असंवेदनशीलता का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

Update: 2022-05-12 03:38 GMT

शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आयोध्या पौळ यांनी राज ठाकरे यांना पाठींबा देणार ट्वीट केले. त्यानंतर उत्तर भारतीयांविरोधात शिवसेना मनसे एकत्र येण्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे या विषयासह राज्यातील विविध मुद्दयांवर मॅक्सवुमनचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी आयोध्या पौळ यांच्याशी संवाद साधला. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आयोध्या पौळ यांची असंवेदनशीलता दिसून आली.

राज्यात सध्या अतिरीक्त ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बीड जिल्ह्यात कारखान्याने ऊस तोडून न नेल्याने शेतकऱ्याने ऊस पेटवून देत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यावर मॅक्स वुमनच्या विशेष मुलाखतीत आयोध्या पौळ यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावेळी त्यांनी या प्रश्नावर हासून असंवेदनशीलता दाखवल्याचे दिसून आले. या विशेष मुलाखतीत विविध प्रश्नांची उत्तरं दिली. मात्र बीड जिल्ह्यात कारखान्याने ऊस न नेल्याने शेतकऱ्याने ऊस पेटवून देत आत्महत्या केली. तर कृषी खाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येवर शिवसेनेची भुमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आयोध्या पोळ यांनी हासून उत्तर देत यावर बोलण्यासाठी मी पक्षाची प्रवक्ता नाही. या राजकीय भूमिका मांडण्यासाठी मी इथे आले नाहीये. या राजकीय विषयावर बोलण्यासाठी आमच्या पक्षातील अनेक हुशार मंडळी बसलेली आहेत. ते यावर नक्कीच बोलतील. असे सांगत प्रश्नाला बगल दिली. मात्र शेतकरी आत्महत्येसारख्या प्रश्नावर आयोध्या पोळ यांनी असंवेदनशीलता दिसून आली.

Full View

Tags:    

Similar News