आई-बहिणीवरून शिव्या देत शिवसेनेच्या नगरसेवकांचा भर रस्त्यात राडा..

भर रस्त्यात एकमेकांना शिव्या देत असलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. प्रभाग निधी खर्च करण्यात नगरसेवकांची चढाओढ लागली आहे याच चढाओढीतुन ठाण्यात शिवसेना नगरसेवकांचा हा राडा पाहायला मिळाला. ठाण्यातील शिवसेनेचा अंतर्गरत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Update: 2022-05-05 06:46 GMT

ठाण्यात नक्की काय चाललं आहे? हाच प्रश्न आता ठाणेकरांना पडला आहे. आगामी पालिका निवडणुका तोंडावर असताना प्रभाग निधी खर्च करण्यात नगरसेवकांची चढाओढ लागली आहे. याच चढाओढीततुन ठाण्यात शिवसेना नगरसेवकांचा एकमेकांना आई बहिणीवरून शिव्या देत भांडण करत असलेला एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नक्की हा प्रकार काय आहे पाहुयात..

आगामी महानगरपालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका घोषित होण्यापूर्वी निधी खर्च करायचा आहे. चार प्रभागनिहाय वार्डात कामाचा जोर वाढला आहे. ह्याच चढाओढीत शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यात राडा पाहायला मिळाला. विकास रेपाळे यांच्यावर वार्डात नम्रता फाटक यांनी काम सुरू केल्याने हा राडा झाला.

शिवसेनेच्या महिला नगरसेविका नम्रता फाटक यांनी विकास रेपाळे यांच्या वार्डात काम सुरू केल्याने विकास रेपाळे भलतेच संतापले आणि त्यांनी कामगारांना दम देत काम थांबवले तिथे शिवसेनेच्या महिला नगरसेविका नम्रता फाटक पोहोचल्या असता दोघांमध्ये शिव्यांचा भडिमार झाला. विकास रेपाळे यांनी नम्रता फाटाक यांना आई-बहिणीवरून शिव्या घालत अंगावर जाण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे ह्याच विकास रेपाळेना आठवड्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्सचा सामाजिक आणि मानवतावादी कामासाठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार हा शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

ठाण्यात प्रभाग क्रमांक 19 मध्ये मीनल संख्ये, नम्रता फाटक विकास रेपाळे आणि नरेश म्हस्के असे शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. अशाप्रकारे एकाच पक्षाच्या नगरसेवकांनी भर रस्त्यात एकमेकांच्या आई बहिणीचा उद्धार करत राडा घातल्याने समाज माध्यमात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सोबत या प्रकरणामुळे ठाण्यात शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

Tags:    

Similar News