पाय नसेल तर काय झालं जिद्द तर आहे; 'बॉडी बिल्डिंग' क्षेत्रात चीनच्या महिलेची जबरदस्त चर्चा!

जिद्द आहे, तर वाट नक्कीच आहे. वाचा गुई यूनाच्या जिद्दीबद्दल!

Update: 2021-01-11 11:42 GMT

कोणत्याही व्यक्तिच्या आयुष्यात सर्वात महत्वाच्या असतात त्या दोन गोष्टी. एक शारिरीक स्वाथ्य आणि दुसरं मानसिक स्वाथ्य. दोन्हींची सांगड घातली तर काहीही सहज साध्य करता येतं. प्रेत्येकाला आपली स्वप्न असतात, त्यासाठी काहीही करण्याची जिद्द असते. हिच जिद्द दाखवलीये ती चीनच्या गुई यूना या महिलेनं. एक पाय नसताना देखील ती बॉडी बिल्डिंग करते.

गुई यूना या चीन मधील बिजिंग प्रांतात राहातात. त्यांच वय ३५ वर्ष आहे. यूना यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयडब्ल्यूएफ बीजिंग २०२० या स्पर्धेत भाग घेतला होता. यात तिची जिद्द पाहून चीनसह जगभरातील लोकांनी तिला पसंती दर्शवत तिचं कौतूक केलं होतं. स्पर्धेदरम्यान ती स्टेजवर हाय हिल्स, बिकिनी आणि तिच्या काठीसह आली होती. गुई अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे

गुई जिममध्ये सतत व्यायामही करते. टिकटॉकवर तिचे 2 लाखहून अधिक फॉलोअर्स आहे. ती चिनच्या नैनिंगमध्ये राहते. तिला तिच्या आईनेच लहनाचं मोठं केलं आहे. गुई लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं.

Tags:    

Similar News