शरद पवारांच्या भेटीला अजित पवार गटातील आमदारांपैकी महिला आमदार कोण?

Update: 2023-07-17 10:13 GMT



आज पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राज्यात सध्या अनेक राजकीय पेच निर्माण झाले आहेत. अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे 30 आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत . हे सगळं सुरू असताना काल अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेले सगळे मंत्री अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले.

त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व मंत्र्यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो असल्याचे सांगितलं आहे . त्यानंतर आज पुन्हा अजित पवार व त्यांच्यासोबतच सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. हे सर्व आमदार शरद पवार यांना भेटण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये गेले आहेत. यावेळी आज जातानाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये नाशिकच्या आमदार सरोज आहिरे या सुद्धा दिसत आहेत..

राष्ट्रवादीच्या २८ आमदारांची सभागृहात दांडी..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे एकूण आमदार ५३ आहेत. यातील नवाब मलिक तुरुंगात असल्यामुळे सध्या ५२ आमदार उपलब्ध आहेत. त्यापैकी अजित पवार गटाचे १५ उपस्थित होते, तर शरद पवार गटाचे ९ आमदार सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादीचे एकूण २८ आमदार अनुपस्थित राहिले.

Tags:    

Similar News