#KanganaRanaut ''हिम्मत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा नपरिधान करून दाखवा'' कंगणाच्या या वक्तव्याला शबाना आझमींचे उत्तर..

Update: 2022-02-11 07:59 GMT

देशात कर्नाटक (karnataka) मधील हिजाबचा (Hijab) मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकारावर सर्वजण आपापली मते व्यक्त करत आहेत. या दरम्यान आता अभिनेत्री कंगना राणौतची (kangana ranaut) प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगनाने लिहिले की, हिम्मत असेल तर अफगाणिस्तानात (afghanistan) बुरखा घालून दाखवा. कंगनाच्या पोस्टवर शबाना आझमी (shabana azmi) यांनीही प्रतिक्रिया देत कंगणाला चांगलंच सुनावलं आहे.

कंगनाने नक्की या प्रकारावर काय पोस्ट केले आहे?

तर कंगणाने तिच्या सोशल मीडियाव लेखक आनंद रंगनाथन यांची पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, 'जर तुमच्यात हिम्मत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा नपरिधान करून दाखवा. आझाद व्हायला शिका आणि पिंजऱ्यात कैद होऊ नका.




 


शबाना आझमी यांनी कंगनाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे की, ''मी चुकीचे असल्यास मला दुरुस्त करा. अफगाणिस्तान एक धार्मिक राज्य आहे आणि मी शेवटचे तपासले तेव्हा भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक होता?

ट्

यापूर्वी या मुद्द्यावर जावेद अख्तर म्हणाले होते की, मी कधीही हिजाब किंवा बुरख्याच्या समर्थनात नाही. पण, जमावाकडून मुलींना धमकावल्याचा निषेध. गणवेशावरून शाळा-कॉलेजमध्ये झालेल्या या गदारोळावर हेमा मालिनी यांनी शाळेतील गणवेशाचा आदर करण्याबाबत बोलले आहे. दुसरीकडे स्वरा भास्कर आणि ऋचा चढ्ढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कर्नाटकातील ही घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर स्वरा भास्कर, किम शर्मा, कमल हसन, नीरज घायवान यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

Tags:    

Similar News