भाजपच्या 'त्या' मागणीला अण्णांचं समर्थन?

Update: 2021-08-30 07:25 GMT

राज्यातील मंदिर उघडण्याची मागणी भाजपकडून सतत करण्यात येत आहे. तर आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करत राज्य सरकारला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिरे उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याबाबत माहिती दिली. यावेळी समिती सदस्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णांनी आपण समितीने केलेल्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे, दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोना वाढत नाही का? असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला.

ज्या मंदिरातील दर्शनाने सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल असंही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News