या घटनेनंतर...रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव...

Update: 2021-11-17 04:45 GMT

अंतराळातील एका घटनेनंतर रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रशियाने स्वतःचा एक उपग्रह क्षेपणास्त्राने नष्ट केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यामुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या क्रू मेंबर्सना धोका निर्माण झाला आहे. उपग्रहाचा स्फोट झाल्यानंतर त्याचा अवशेष अंतराळ परिसरात पसरल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. हे टाळण्यासाठी आयएसएसवरील सात क्रू मेंबर्सना कॅप्सूलमध्ये जावे लागले. त्यामुळे त्यांच्या कामाला फटका बसला आल्याच अमेरिकेने म्हंटले आहे.

रशियाचे वर्तन बेजबाबदार...

रशियाच्या ( Russia) या कृतीमुळे अमेरिकन ( United states) सरकार आणि नासा संतापले आहेत. रशियाचे हे पाऊल धोकादायक आणि बेजबाबदार असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, ते बर्याच काळापासून रशियाच्या अंतराळ क्रियाकलापांवर नजर ठेवत होती आणि तिला रशियाची ही हालचाल जाणवली होती. पृथ्वीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने अंतराळात आपल्या लक्ष्यावर आदळल्याची घटना आतापर्यंत केवळ चार वेळा घडली आहे. नासाचे म्हणणे आहे की, रशियाच्या या निर्णयामुळे अंतराळात नवीन शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू होण्याची भीती आहे.

लेझर शस्त्रांचा धोकाही वाढेल

रशियाच्या या निर्णयामुळे अंतराळात केवळ शस्त्रास्त्रांची शर्यतच सुरू होणार नाही, तर अवकाशात लेझर शस्त्रांचा धोकाही वाढेल, असे अमेरिकेने म्हटले आहे. रशियाचे हे पाऊल अमेरिकन सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले आहे. उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर हे बेजबाबदार कृत्य असल्याचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हंटल आहे. उपग्रहाचे सुमारे 1500 तुकडे कक्षेत तरंगत आहेत आणि यामुळे ISS ला धोका निर्माण झाला आहे. याबाबत अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांशी चर्चा करत असल्याचं देखील त्यांनी म्हंटले आहे.

Tags:    

Similar News