"राजकीय हव्यासापोटी एका मुलीचे आयुष्य बरबाद केले", रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

Update: 2022-04-12 10:48 GMT

रघुनाथ कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांच्या दबावाने जबाब नोंदवण्यास भाग पाडले असल्याचा धक्कादायक खुलासा पीडितेने केला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात येतील असं रुपाली चाकणकर यांनी म्हंटल आहे.

राज्यभरात गाजत असलेलं शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक यांच्या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पिडीतेने आता थेट तिला मदत करणाऱ्या भजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच धक्कादायक आरोप लावले आहेत. रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला मला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं त्यासाठी त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी देखील दिली असे खळबळजनक आरोप पिडीतेने साम टीव्ही न्युजशी बोलताना केले.

या सर्व प्रकारानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी एका मुलीचे आयुष्य बरबाद केलं असल्याचं म्हणत चौकशी करून संबधीत व्यक्तीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात येणार आल्याचं म्हंटल आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या..

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी, "काही व्यक्ति स्त्री सुरक्षेच्या दृष्टीने दिवसभर टाहो फोडतात. पण स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी एका मुलीचे आयुष्य बरबाद केले आहे. मंदीत संधी साधणारे हे लोक आहेत. आज पीडितेनेच खळबळजनक वक्तव्य करून खुलासा केला आहे. पीडित मुलीला भेटून यामध्ये काय धागेदोरे आहेत? हे नक्की काय प्रकरण आहे? याची संपूर्ण माहिती घेऊन जर कोणी आशा पद्धतीने एका व्यक्तीला बदनाम करत असेल किंवा एखाद्या तरूणीचे आयुष्य बरबाद करत असेल तर त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाकडून देण्यात येतील असं म्हंटल आहे.

नक्की काय आहे प्रकरण

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्यावर एका मुलीशी लग्नाचे आम्हीच देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली होती. हे प्रकरण भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

Tags:    

Similar News