#JioConventionCentre ; नीता अंबानी यांचे भव्यदिव्य 'जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर' मध्ये काय असणार आहे ?

Update: 2022-03-05 06:03 GMT

 रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका व रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी (nita ambani) यांनी ब्रांड्रा कुर्ला येथे 'जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर'चे (Jio World Centre) उद्घाटन केले आहे. 18.5 एकरमध्ये पसरले आहे. जिओ वर्ल्ड सेंटर ही आपल्या गौरवशाली राष्ट्राची आणखी एक कामगिरी आहे. अनेक सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र मुंबईचे नवे लँडमार्क म्हणून पाहिले जाईल. या सेंटरची रचना देखील देखील खास करण्यात आली असल्याचे नीता आबांनी यांनी सांगितले.

1 लाख 7 हजार 640 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या दोन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 10 हजार 640 लोक बसू शकतात. 1 लाख 61 हजार 460 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेले 3 हॉल देखील या ठिकाणी बनवण्यात आले आहेत, ज्यामध्ये 16 हजार 500 लोक एकाच वेळी कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. याशिवाय 3 हजार 200 लोक बसतील असे बॉलरूम आणि 25 मीटिंग रूमचीही व्यवस्था या केंद्रात करण्यात आली आहे.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर हा प्रत्यक्षात जिओ वर्ल्ड सेंटरचा एक भाग आहे. सुरुवातीच्या टप्प्यात धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि म्युझिकल 'फाउंटन ऑफ जॉय' उघडण्यात आले आहेत. मुंबईचे प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन जिओ वर्ल्ड ड्राइव्हचे अनावरणही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आले होते. कन्व्हेन्शन सेंटर व्यतिरिक्त सर्व्हिस केलेले अपार्टमेंट आणि कार्यालये असलेले सांस्कृतिक केंद्र, संगीत कारंजे, दुकाने, कॅफे आणि रेस्टॉरंट असलेले हे भारतातील पहिलेच सेंटर आहे.

जिओ वर्ल्ड सेंटरचे आकर्षण असलेले धीरूभाई अंबानी स्क्वेअरही सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. येथे सर्वसामान्यांना मोफत प्रवेश मिळेल, dhirubhaiambanisquare.com वरून मोफत पास बुक करता येतील. ते फाउंटन ऑफ जॉयचे संगीतमय सादरीकरण, पाण्याचे कारंजे, दिवे आणि संगीत यांचे अद्भुत संयोजन देखील पाहू शकतील.

Tags:    

Similar News