तूपकरांची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा....

Update: 2021-11-19 09:42 GMT

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8 हजार रुपये आणि कापसाला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामध्ये गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतला नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. अजूनही सरकारने त्यांची कुठलीच दखल घेतली नसल्याने त्यांचे अन्नत्याग आंदोलन अजूनही सुरूच आहे. तर जोपर्यंत सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाही तोपर्यंत जीव गेला तरी बेहत्तर मात्र अन्नाचा एक कणही घेणार नाही अशी ठाम भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे.

मात्र यावेळी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला त्यांच्या आईने भेट दिली. त्यावेळी तूपकरांची प्रकृती पाहून त्यांच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. "आपला लेक शेतकऱ्यांसाठी लढतोय त्यामुळे त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा त्याच्या जीवाला जर काही बरे वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर असेल", अशी संतप्त प्रतिक्रीया यावेळी त्यांनी दिली.


Full View

Tags:    

Similar News