कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक...

Update: 2022-08-19 02:53 GMT

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक आहे. 10 दिवसांपासून त्यांच्यावर सतत उपचार सुरू आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होताना दिसत नाही. शुक्रवारी एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, राजूच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. पूर्णपणे ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आता ठेवण्यात आले आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, कुटुंबातील सर्व सदस्य दिल्ली एम्समध्ये पोहोचले आहेत.

कॉमेडियन राजूचा मित्र एहसान कुरेशी म्हणाला, 'राजू गेल्या 25-30 तासांपासून बेशुद्ध आहे. त्याचा मेंदू प्रतिसाद देत नाही. प्रकृती ढासळल्यानंतर केवळ प्रार्थनांचा आधार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आम्ही त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत." त्याचवेळी लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, "राजू भाई, धीर सोडू नका. जरा जास्त जोर लावा.'

राजूच्या मोठ्या भावाच्या म्हणण्यानुसार रक्तदाबही कमी झाला आहे. डॉक्टरांनी बीपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे दिली, पण त्याचा प्रभाव संपताच पुन्हा बीपी कमी झाला.

10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता.. 

10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने राजू यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला झटका आला. दहाव्या दिवशीही ते अजून बेशुद्ध अवस्थेत आहेत.

राजूचे पीआरओ गरवीत नारंग म्हणाले, "बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यांच्या मेंदूच्या वरच्या भागात सूज आणि पाणी असल्याचे आढळून आले. त्यांना वारंवार झटके येत आहेत. डॉक्टर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत आहेत. गुरुवारी रात्री परिस्थिती थोडी नियंत्रणात आली आहे.त्यांच्या शरीराच्या हालचाल पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे.

गुरुवारी त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच देशभरातील लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. कानपूरमध्येही त्यांच्या चाहत्यांनी, नातेवाईकांनी पूजा-हवन सुरू केले आहे. कॉमेडियन सुनील पालने त्यांचा रडतानाचा व्हिडिओ जारी केला आहे. त्यात लिहिले होते, "राजूसाठी प्रार्थना करा. तो अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. डॉक्टरांनाही काय करावे हे कळत नाही. मेंदूनेही काम करणे बंद केले आहे. राजू भाऊ लवकर बरे व्हा." अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल यादवनेही व्हिडिओ जारी केला आहे आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:    

Similar News