रायगड पोलीसांचा अभिनव उपक्रम; महिलांना गुड टच, बॅड टचचं प्रशिक्षण!

Update: 2021-01-22 07:24 GMT

देशात वारंवार महिला अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यात रायगड पोलीसांनी पोलीस दीदी यांच्या मार्फत महिलांना विविध पद्धतीने सुरक्षेचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे महिला अत्याचारांच्या बाबतीत मुलींना तसेच महिलांना जागृत करून त्यांच्या कळत नकळत होणाऱ्या शोषणापासून सुरक्षा कशी करता येईल याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.



पोलीसांनी जिल्ह्यातील विविध शाळा, हायस्कूल, आश्रमशाळा येथील विद्यार्थिनींना तर प्रशिक्षण देण्यास सुरूवात केलीच आहे. पण त्याच बरोबर जिल्ह्यातील विविध आदिवासी पाड्यांवरील महिला, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला वर्गाला देखील महिला अत्याचार, गुड टच बॅड टच, महिला सक्षमीकरण इ. संदर्भात पोलीस दीदी यांच्या मार्फत महिलांसाठी असलेल्या कायद्याची माहिती देण्यात येत आहे.



रायगड पोलीसांनी सुरू केलेला हा उपक्रम एक आदर्श उपक्रम असून शहरातील विविध भागांतील महिलांना याच्यामुळे त्यांची स्वतःची सुरक्षा कशी करावी याबाबत माहिती मिळत आहे. पोलीसांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे शहरातील महिला अत्याचाराच्या घटनांपासून महिलांचा बचाव करण्यात पोलीसांना काही अंशी मदतच होणार आहे.

Tags:    

Similar News