त्या मुलीला १०वीच्या परिक्षेसाठी लेखनिक मिळणार, महिला आयोगाचे आदेश

पुण्यात एका दहावीत शिकत असलेल्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्या मुलीला आजपासून सुरू होत असलेल्या परिक्षेसाठी लेखनिकत देण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.

Update: 2022-03-15 07:58 GMT

पुण्यामध्ये एका शाळकरी मुलीवर वर्गात घुसून चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेतील मुलगी १०वीत शिकतेय. या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयात जाऊन मुलीची भेट घेतली. आजपासून तिला १० वीची परीक्षा द्यायची असल्याने तिला लेखनिक दिला जाईल, असे निर्देश त्यांनी दिले.

"काल एकतर्फी प्रेमातून हल्ला करण्यात आलेल्या मुलीची मी भेट घेतली. आरोपीने हल्ला केल्यानंतर आरोपीने विष घेतलं. मुलीची मानसिक अवस्था लक्षात घेऊन तिचा जबाब नोंदवला नाही. तिला 10 वीची परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी लेखनिक देणार आहे. अशा पद्धतीच्या घटना घडू नये, यासाठी परीक्षेच्या ठिकाणी निर्भया पथक नेमले जाणार आहे. मुलीवर हल्ला झाल्यावर 20 मिनीट ती मुलगी तशीच होती, तिला शिक्षक आणि मुख्याध्यापकाने वाचवले नाही, त्यामुळे शाळेवरही कारवाई होईल", असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

वर्गात घुसून विद्यार्थिनीवर झाला चाकू हल्ला

पुण्यातील वडगाव शेरी येथील इनामदार शाळेत इयत्ता दहावीच्याो विद्यार्थिनीवर एका तरुणाने वर्गात घुसून चाकूने हल्ला केला. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वर्गात जाऊन विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Tags:    

Similar News