धुळे: वाढत्या महाघाई विरोधात निदर्शने

Update: 2021-06-30 07:53 GMT

मुंबई: पेट्रोल-डीझेल पाठोपाठ इतर गरजेच्या वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामन्यांना जगण कठीण झालं आहे. याच वाढत्या महाघाई विरोधात धुळ्यातील शिरपूर येथील तहसील कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली असून, जनतेने जगायचे तरी कसं असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले.

निवेदनातील मागण्या..

यावेळी दिलेल्या निवेदनात, औषधी व जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती त्वरीत कमी करा, कोवीडची लस पुरेशे प्रमाणात सर्वांना मोफत उपलब्ध करा,घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती कमी करा. प्रमाणपत्र धारक वन अतिक्रमण धारकांना बँकेकडून पीककर्ज त्वरीत उपलब्ध करून द्या अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

Tags:    

Similar News