प्रणिती शिंदे म्हणाल्या 'मला ईडीची भिती'...

Update: 2024-03-23 06:12 GMT

मला ईडीची कसलीही भिती नाही, मी भाजपच्या विरोधात बोलणारच असं बेधडक वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. यापुर्वीचे भाजपचे दोन्ही खासदार हे अकार्यक्षम ठरल्यामुळे त्यांना उमेदवार बदलावा लागला आहे आणि आता तर त्यांना कोणी भेटतच नाही अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार शिंदे म्हणाल्या की, माझ्याकडे कारखाना, बँक आणि सोसायटी नसल्याने मला ईडीची कसलीही भिती नाही, त्यामुळे मी भाजपच्या विरोधात बोलणारच असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील होटगीमध्ये बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे.

ही लोकशाही आहे की हुकूमशाही?

यावेळची निवडणूक ही 'करेंगे या मरेंगे' अशी असणार आहे. लोकशाही आणि संविधान संपवण्याचा डाव भाजप मोदी करत आहेत. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली त्यासोबतच काँग्रेस पक्षाची सर्व पक्षांची खाती गोठवण्यात आली, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसचे डी.के. शिवकुमार यांना सुध्दा अटक करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाला संसदेत बोलू दिलं जात नाही. त्यांचे माईक बंद करतात. ही लोकशाही आहे की, हुकूमशाही? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Tags:    

Similar News