मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका- रेणुका शहणे

Update: 2024-05-07 07:49 GMT

देशभरात लोकसभा निवडणुका चालू आहेत, अशात अनेक वाद-विवाद आणि वेगवेगळ्या चर्चा समोर येतांना दिसत आहेत. भाषिकवादला, प्रांतवादाला किंवा जाती- धर्म आशा अनेक वादाला तोंड फुटत आहे, आशातच 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मराठी अभिनेत्रीची पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ज्यांनी मराठीच नाही तर हिन्दी चित्रपटसृष्टिवर देखील आपल्या कामाचा एक आगळा वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे.

रेणुका शहाणेंनी नुकतीच आपल्या सोशल मीडियाच्या x हँडलवरुण एक पोस्ट केली असून, ती पोस्ट बॉलीवुड किंवा मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित नसून मराठी "not welcome" म्हणणाऱ्यांचा समाचार घेणारी पोस्ट केली आहे. रेणुका शहाणेंनी आपल्या सोशल मीडियाच्या ऑफशियल x हँडलवरून केलेल्या पोस्ट मध्ये त्या म्हणतात "मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका" असे परखड मत नेमक्या निवडणुकीच्या काळात रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं आहे. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका" असेही पुढे त्या म्हणाल्या आहेत. याच पोस्ट मध्ये रेणुका शहाणेंनी ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका" असा सल्ला मराठी लोकांना दिला आहे.

रेणुका शहाणे कुठल्याच जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध नाहीत असं सांगतांना त्या म्हणतात, "कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही,पण जे आपल्याच महाराष्ट्रात, राहून आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे. रेणुका शहाणे यांनी अशी भूमिका मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांबद्दल घेतलेली दिसत असून, मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या लोकांना मत ही देऊ नका असं आश्वासन केलं आहे.

रेणुका शहाणे यांच्या या x हँडलवरील पोस्टवर अनेक यूजर्सच्या कॉमेंट आल्या आहेत, ज्यामध्ये प्रतीक एस पाटील यांनी कॉमेंट केली असून "भूमिका घेतल्याबद्दल आभार रेणुका ताई" असे म्हटले आहे. तर गजानन नावाच्या युजरने "आधी तुम्ही हिंदी चित्रपट, मालिकां मध्ये काम करणे बंद करा" असा सल्ला कॉमेंटच्या माध्यमातून दिला आहे.

रेणुका शहाणे यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्यांनी "सुरभी" या हिंदी भाषेतील प्रचंड लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दोन अँकरपैकी एक म्हणून काम केले, ज्यामुळे तिचे घराघरात नाव झाले. दूरदर्शन हे भारतातील एकमेव टीव्ही चॅनेल असताना तिचे रुंद हास्य आकर्षण बनले होते आणि रेणुका नक्कीच 1980 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय टीव्ही व्यक्तिमत्त्वांपैकी एक होत्या.

Tags:    

Similar News