मुंबईत आठवड्यातील एक दिवस महिलांच्या लसीकरणासाठी राखीव

Update: 2021-09-15 13:55 GMT

वाढत्या कोरोना रोखण्यासाठी लसीकरण ( Corona Vaccination ) हे एकमेव पर्याय सद्या जगासमोर उरला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. राज्यात 55 टक्के नागरिकांचा पहिला तर 25 नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत. मात्र असं असताना मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून यापुढे महिलांच्या लसिकरणावर भर देण्यात येणार असून, महिलांचं लसीकरणाचं प्रमाण वाढवं यासाठी मुंबई महापालिका महिला विशेष लसीकरण( Women special Corona vaccination ) सत्र सुरु करणार आहे. 

आठवड्यातील लसीकरणाचा एक दिवस मुंबई महापालिका ( mumbai municipal corporation ) क्षेत्रात महिलांसाठी राखीव असणार आहे. तसेच महानगरपालिकेकडून पुढील दोन आठवडे प्रायोगिक तत्वावर महिलांच्या लसीकरणासाठी दोन दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह असणार आहे.

महिलांची लसीकरणातील टक्केवारी वाढावी याकरिता मुंबई महापालिका प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये 42.32 टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये 47 लाख 13 हजार 523 महिलांनी तर 63 लाख 07 हजार 471 पुरुषांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत 1182 गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. त्यामुळे महिलांच्या सुविधेसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये घराजवळच लसीकरण केंद्र उपलब्ध होईल, असा प्रयत्नही मुंबई महापालिका प्रशासनानं केला आहे.

Tags:    

Similar News