अमरावतीमध्ये हिंसाचार: "याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांनी शांतता राखावी": यशोमती ठाकूर

Update: 2021-11-13 07:09 GMT

त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधवावरील अत्याचाराविरोधात अमरावतीत दुपारी मुस्लिम बांधवांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. यात अमरावती शहरातील 20 ते 22 दुकानात तोडफोड झाली व काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली.

त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मुस्लिम मोर्चा विरोधात आज भाजपने अमरावती शहर बंदचे आवाहन केलं आहे. यावर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये, अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल तर याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांना शांतता राखावी असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला,बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.


Full View

Tags:    

Similar News