३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कडक शिक्षा व्हावी - डॉ. नीलम गोऱ्हे

Update: 2022-08-05 15:46 GMT

भंडारा जिल्ह्यात येथील घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेला या अत्याचारामुळे तीव्र जखमी व प्रचंड रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. दिल्लीतील 'निर्भया' प्रकरणासारखी ही घटना असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे (उपसभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य) यांनी पिडीत महिलेचा कुंटुंबिंयासोबत प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला, न्याय मिळण्याकरीता आम्ही सर्वोपरीने कायदेशीर आम्ही मदत करणार अशी ग्वाही दिली. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या उपनेत्या ना.डॅा.नीलमताई गोऱ्हे यांना वृत्तवाहिन्याचा माध्यमातून आलेल्या बातमी नुसार व त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व विभागीय प्रवक्ता शिल्पा बोडखे व शिवसेना महिला आघाडी नागपूर महिला पदाधिकारी समवेत जाऊन भेट घेतली

नागपूर मेडीकल कॅालेजचे डिन श्री. डॅा. सुधीर गुप्ता यांच्याशी दुरध्वनी संपर्क माध्यमातून पिडीत महिलेची प्रकृतीची विचारणा केली. तिच्या सर्व ऊपचारासाठी शासकिय स्तरावर सर्व काळजी घेतली जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. तसेच भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक (का) श्री. अनिकेत भारती यांनीही या घटनेबद्दल अधिक गतीने तपास करून योग्य ती कार्यवाही ह्वावी याबाबत त्यांनीही पावले ऊचला आहेत .

सदरील घटनेबाबत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मा.श्री. छेरींग दोर्जे (विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र) यांच्या कडे काही मागण्या केल्या आहे. यामध्ये दुरध्वनी संपर्क माध्यमातून लक्ष वेधले

१)या घटनेच्या सर्व संबंधीत आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करावे

२) घटनेचा तपास जलदगतीने करावा.

३)सदरील घटनेतील आरोपीस मदत करणारे त्याचे साथीदार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तसेच त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व कडक कलमे लावण्याचं यावीत .

४)सदर महिलेला समुपदेशन तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसन यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती.

Tags:    

Similar News