''नवनीत राणा यांना वार्ता रोग…'' नीलम गोऱ्हे यांचा नवनीत राणांवर हल्लाबोल..

जसे वेगवेगळा प्रकारचे आजार होतात, तसच नवनीत राणा यांना वार्ता रोग झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करत आहेत, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केली आहे.

Update: 2022-05-11 13:15 GMT

राज्यात मागील अनेक दिवसांपासून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. या सगळ्या गदारोळात खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांचे नाव मोठं चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली व मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान सरकारला दिला.

आता या सगळ्यात हनुमान चालीसा पठाण करण्याचा मुद्दा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी लावून धरला व संपूर्ण राज्यात रान पेडवलं. मागच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान दिलं. आणि त्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. आता 14 दिवसांच्या पोलिस कोठडी नंतर ते दोघे बाहेर आले आहेत. पण आता जेल मधून बाहेर आल्यानंतर देखील त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा सगळ्या प्रकरणावरून आज विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी "नवनीत राणा यांना वार्ता रोग झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करत आहेत" असं म्हणत टीका केली आहे.

त्यांनी नवनीत रणांवर टीका करताना पुढे म्हंटले आहे की, जसे वेगवेगळा प्रकारचे आजार होतात, तसच नवनीत राणा यांना वार्ता रोग झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करत आहेत, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केली. सांगलीमध्ये त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जे जे टीका करतात त्या नेत्यांना केंद्र सरकार हे वाय सुरक्षा देत आहे, त्यामुळे बहुतेक ती एक सुरक्षा योजना सुरू केली असावी, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केली. संवाद तोच पात्र बदलेल असते. यांचे सुत्रदार आणि डायरेक्टर जे आहेत ते दिल्लीतलेच आणि मुंबईतले आहेत तेच आहेत. तुम्ही फक्त नाव पुढची बदला बाकी आरोप तेच.

Tags:    

Similar News