एकतर्फी प्रेमातून तरुणीची गोळी मारून हत्या की लव्ह जिहाद?

निकिताचे वडील मूळचंद तोमर यांनी सांगितले, 'तौसिफ २०१८पासून निकिताच्या मागे होता. त्यांनी त्याची पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी माफी मागून असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची हमी दिल्याने आम्ही तक्रार मागे घेतली. असं म्हटलं आहे.

Update: 2020-10-29 14:00 GMT

फरिदाबादमधील वल्लभगड येथे एका महाविद्यालयीन तरुणीचा दिवसाढवळ्या भररस्त्यात खून केल्याचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमाराला घडली.

उत्तर प्रदेशच्या हापूल येथिल हे कुटुंब फरिदाबाद येथे शिफ्ट झाले होते. निकिता तोमर असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून आरोपी तौशीफ बरोबर ती १२ वी पर्यंत शिकत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकीताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले.

आता निकिताच्या वडिलांनी ही हत्या लव्ह जिहादमधून करण्यात आल्याचा आरोप केला. मात्र स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडले असल्याचे सांगितले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत अगरवाल महाविद्यालयाच्या समोर एका पांढऱ्या I20 कार मधून दोन तरूण बाहेर आले आणि त्यांनी या दोन तरुणींना अडवले. त्यानंतर त्यांपैकी एका तरुणाशी तरुणीशी बाचाबाची झाली. त्यानंतर त्या तरुणाने त्या तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध केला. त्यानंतर त्या तरुणाने रिव्हॉल्वहस बाहेर काढत थेट तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.

दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याचं हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News